महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:47 IST2018-10-21T23:47:23+5:302018-10-21T23:47:38+5:30
ओझर टाउनशिप : येथील एका घराच्या दरवाजाची आतील कडी जाळीवाटे हात घालून उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत चोरून नेली.

महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली
ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल
ओझर टाउनशिप : येथील एका घराच्या दरवाजाची आतील कडी जाळीवाटे हात घालून उघडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. रविवारी (दि.२१) पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास निर्मल प्रकाश गाळणकर यांच्या मातोश्री घरात झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची आतील कडी जाळीवाटे हात घालून उघडून घरात प्रवेश केला व घरात झोपलेल्या निर्मल यांच्या मातोश्रीच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत चोरून नेली असल्याची तक्र ार गाळणकर यांनी ओझर पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.