शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शहरात रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:40 AM

येथील पंचवटी परिसरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.

पंचवटी : येथील पंचवटी परिसरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. वाल्मीकनगर श्रीराम मंदिरात सकाळी काकडा आरती व स्थानिक भाविकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता रामजन्म साजरा करण्यात आला. श्रीराम कला, क्रीडा मित्रमंडळाच्या वतीनेकार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी महापौर अशोक मुर्तडक, सभापती हिमगौरी आडके नगरसेवक गुरमित बग्गा, रूची कुंभारकर, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, रूपाली गावंड, सरिता सोनवणे, शांता हिरे, बाळासाहेब पाटील, छबू गावंड, रमेश ढोले, भालचंद्र निरभवणे, राहुल कुलकर्णी, किरण सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुका व मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. सेवाकुंज, काट्यामारुती चौक, गुरुद्वारारोड, गजानन चौक, सेवाकुंज आदी परिसरातून मिरवणूक काढण्यात येऊन वाल्मीकनगरला समारोप करण्यात आला. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी श्रीराम मित्रमंडळाने परिश्रम घेतले. नागचौकातील नागेश्वर मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी साजरी करण्यात आली. रामनवमीनिमित्ताच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि.२४) सायंकाळी साईबाबा पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. फुलांनी सजविलेल्या चित्ररथातून पालखी मिरवणूक परिसरातून काढण्यात आली. रविवारी दुपारी रामनवमीनिमित्ताने भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्र म झाला. शिवाजी चौकातील गुरुदत्त शैक्षणकि सामाजिक कला, क्र ीडा मंडळातर्फे यंदाही दरवर्षीप्रमाणे रामनवमीनिमित्ताने रविवारी (दि.२५) दुपारी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळ शेकडो भाविकांना मोफत सरबतचे वाटप करण्यात आले. मंडळाचे संस्थापक गुलाब भोये यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते.  सीतागुंफा येथे राम जन्मोत्सव व महाप्रसाद वाटप कार्यक्र म झाला. या कार्यक्र माचे आयोजन सीतागुंफा संस्थान व गोसावी परिवाराच्या वतीने केले होते. रविवारी (दि.२५) सकाळी महंत कविंद्रपुरी गोसावी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येऊन रामजन्म साजरा करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, माजी सभापती राहुल ढिकले, योगेंद्र गोसावी, हिमांशु गोसावी आदींसह भाविक उपस्थित होते.फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामाची मूर्तीश्री काळाराम मंदिरात रामनवमी (रामजन्मोत्सव) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फुलांनी सजवलेल्या पाळण्यात रामाची मूर्ती ठेवण्यात आली होती. रामनवमीनिमित्ताने शेकडो भाविकांनी रामनामाचा जप करून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.जन्मोत्सवाची घटिका जवळ येत असताना ढोल-ताशा आणि शंख ध्वनीमध्ये रामनामाचा जयघोष करणाऱ्या भक्तांचा उत्साह दुणावला होता. दुपारी १२ वाजेचा तो जन्मोत्सवाचा क्षण जवळ आला आणि उत्साह अधिक वाढला त्यानंतर श्रीरामांच्या जयघोषात पुष्प, गुलालाची उधळ करीत हा क्षण साजरा करण्यात आला.   शहरातील मंदिराच्या आवारात राम-जन्मोत्सवानिमित्ताने भजनी मंडळांचा भजनांचा कार्यक्रमही संपन्न झाला.विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.सिडकोत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनवमी साजरीसिडको :सिडको भागात विविध मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.रायगड चौकातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रभागाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रेरणा महिला भजनी मंडळाच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. राम नामाच्या जयघोषाने सिडको परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. यावेळी नगरसेवक श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, श्रीराम मंडळाचे हरिभाऊ आढाव, गोविंद शिंपी, दिलीप ठाकूर, अंबादास संधान, त्र्यंबक उशीर, सुनील खैरनार, गोसावी, सोपान राणे, चिंधू ठाकरे, नाना निकुंभ, गोपीनाथ सोनवणे, शिवाजी निकम, जगन्नाथ कुºहे, विनायक थोरात आदी उपस्थित होते.उत्तमनगर येथील श्रीराममंदिर महापूजाउत्तमनगर येथील श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण व बजरंगबली यांच्या मूर्तींची अभिषेक व महापूजा करण्यात आली. यानंतर स्वानंदी महिला मंडळाचा भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सायंकाळी ग्रुपचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. यावेळी महाआरती व महाप्रसादासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रभू श्रीराम मित्रमंडळ, श्रीराम युवा मित्रमंडळ, श्रीराम महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

टॅग्स :Ram Navamiराम नवमी