राज्य युवा संघर्ष पुरस्काराने रेखा मंजूळकर सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:40 IST2021-02-06T16:38:59+5:302021-02-06T16:40:08+5:30

वरखेडा : दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा मंजूळकर यांना महाराष्ट्र राज्य दलित-आदिवासी क्रांती दलाच्या वतीने राज्य स्तरीय युवा संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिंडोरी येथे पार पडला.

Rekha Manjulkar honored with State Youth Struggle Award | राज्य युवा संघर्ष पुरस्काराने रेखा मंजूळकर सन्मानित

दलित आदिवासी क्रांती दल संस्थेच्या वतीने रेखा मंजूळकर यांचा सत्कार करताना विनोद भोसले समवेत. रविंद्र जाधव, प्रिया सुरते,सागर निकाळेआदेश वानखेडे आदी.

ठळक मुद्देआदिवासी क्रांती दलाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

वरखेडा : दिंडोरी येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा मंजूळकर यांना महाराष्ट्र राज्य दलित-आदिवासी क्रांती दलाच्या वतीने राज्य स्तरीय युवा संघर्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिंडोरी येथे पार पडला.

दलित आदिवासी क्रांती दलाचे प्रनेते विनोद भोसले, आदेश वानखेडे, वैभव निकाले, दिंगबर पठाडे, प्रविण वानखेडे, प्रतिक साळवे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती संथापक रविंद्र जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे, सिने अभिनेत्री प्रिया सुरते, उमा दिंडे, बाळू जाधव, टायगर ग्रुपचे विक्रम गायकवाड, दलित आदिवासी क्रांती दलाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Rekha Manjulkar honored with State Youth Struggle Award