शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पूरग्रस्त मुंगसरे ग्रामस्थांचे गायरान जागेवर पुनर्वसन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:06 AM

आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते.

मातोरी : आळंदी नदीच्या किनारी वसलेल्या मुंगसरे गावाला दहा दिवसांपूर्वी पुराचा जोरदार फटका बसून, गावातील कोळीवाडा संपूर्ण पाण्यात गेल्याने तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले होते. पुराचा नेहमीच या भागाला फटका बसत असल्याने गावातील कोळीवाडा व इतर परिसरातील रहिवाशांना शासनाने गायरानातील जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांचे तेथे पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.दहा दिवसांपूर्वी जोरदार झालेल्या पावसाने आळंदी धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे आळंदी नदीला आलेल्या पुराचा मुंगसरे गावालाफटका बसला. नदीकिनारी असलेल्या शेतकऱ्यांची पिके, शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. त्यातून त्यांना सावरणे कठीण असले तरी अशा आपत्तीचा फटका परत बसू नये व जनतेच्या आर्थिक, शारीरिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी नदीकिनारी असलेल्या कोळीवाडा व इतर वस्तीला गायरानात स्थलांतरित करावे व तेथे अत्यावश्यक सुविधा देत पुनर्वसन करावे, असा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासाठी ठराव व गावातील गावकऱ्यांच्या सह्या घेऊन त्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.यावेळी सरपंच कल्पनाताई भोर, उपसरपंच दीक्षिराम फडोळ, पोलीस पाटील बबन म्हैसधुणे, तलाठी प्रतिभा घुगे, शिवाजी भोर, विष्णुपंत म्हैसधुणे, रघुनाथ आंबेकर, सुधाम म्हैसधुणे, साहेबराव चारोसकर, भास्कर म्हैसधुणे, हिरामण नारळे, भाऊसाहेब धुळे, सुवर्णा आंबेकर आदी उपस्थित होते.गावाला आळंदी नदी, रामगंगा, म्हशिध ओहोळ आदी नाल्यांचे पाणी गावातून वाहत जाऊन नदीला मिळत असल्याने प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा परिणाम गावातील घरांमध्ये पाणी शिरले. नदीकाठी गाव असल्याने ते स्थलांतरित होणे आवश्यक आहे. याबाबत निवेदने जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देणार आहोत, तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.- विष्णुपंत म्हैसधुणे, राष्ट्रवादी कार्याध्यक्षपुरामुळे गावातील सर्व लोके दोन दिवस मंदिरात आसरा घेऊन होते. त्यामुळे कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा यासाठी गावामधील गायरानातील सुमारे दीडशे एकर जमिनीवर नदीकाठावरील लोकांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी गावाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.  - कल्पनाताई भोर, सरपंच

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका