शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संदर्भ रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:33 AM

नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. यासंदर्भात आमदार जयंत जाधव यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच चालू आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळालेली असूनही यासाठी आवश्यक नेफ्रॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता झालेली नाही. या रुग्णालयात डायलिसीससाठी दरदिवशी २० रुग्णांची प्रतीक्षा यादी असून, तीन सत्रात डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयास १० डायलिसीस यंत्रे व डायलिसीस खुर्च्यांची तसेच आवश्यक मनुष्यबळाची निकड आहे. तसेच अमरावतीच्या संदर्भ सेवा रुग्णालयाप्रमाणे नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि पेडियाट्रिक आदी विकारांवरील विभाग सुरू करण्यासाठी येथे दोन मजले वाढवून २०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. येथील कामाचा व्याप लक्षात घेता आकृतिबंधाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात वैद्यकीय व शुश्रूषा संवर्गातील परिचारिकांची पदे नव्याने निर्माण करून सदर पदे भरण्याबाबत विभागीय उपसंचालकांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रुग्णालयाचे २०० बेडमध्ये रूपांतर करण्याची गरज असून, येथील मूत्रपिंड शस्त्रक्रिया विभाग लवकरत लवकर सुरू करण्यासाठी शासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड शस्त्रक्रिया येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू करण्यात येईल, असे त्यांनी आमदार जाधव यांना आश्वासित केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यासाठी लवकरच नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा जिल्ह्यातील अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.शंभरावर पदे रिक्तमंजूर आकृतिबंधाप्रमाणे ३६७ पदांपैकी ९२ पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. येथे अतिविशेषोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी शंभरावर पदे रिक्त आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल