लाल कांदा दरात १०० रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:21 IST2021-04-05T20:08:21+5:302021-04-06T00:21:45+5:30

उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

Red onion prices fall by Rs 100 | लाल कांदा दरात १०० रुपयांनी घसरण

उमराणे बाजार समितीत कांद्याची झालेली प्रचंड आवक.

ठळक मुद्देनऊ दिवसांनंतर बाजार समित्या सुरू : आवकेत वाढ, उन्हाळी कांद्याचे दर लाल कांद्याच्या तुलनेत काहीअंशी तेजीत

उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

परिणामी आवक वाढल्याने मागील आठवड्यातील बाजारभावाच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली असून, सर्वोच्च ८५० रुपये दराने विकला गेला, तर नवीन उन्हाळी कांदाही बाजारात विक्रीस येऊ लागला असून, त्याचे दर स्थिर राहत सर्वोच्च १२०१ रुपयांपर्यंत विकला गेला.

चालूवर्षी उन्हाळ ( गावठी ) कांदा लागवडीसाठी बहुतांशी शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे नसल्याने कांदा लागवडीकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी केले होते. परंतु उन्हाळी म्हणून लागवड केलेले कांदे लाल निघाल्याने एकीकडे फसवणूक तर झालीच; परंतु हा कांदा विक्रीशिवाय पर्यायही नसल्याने शिवाय गेल्या आठ दिवसांपासून बाजार समितीला सुट्टी असल्याने हा कांदा शेतातच पडून होता. त्यामुळे बाजार समिती केव्हा सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.

बाजार समितीचे कामकाज सुरू होताच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाल कांदा विक्रीसाठी येथील बाजार समितीत एकच गर्दी केली होती. परिणामी आवक वाढल्याने लाल कांद्याच्या दरात शंभर रुपयांची घसरण होत कमीत कमी ४०१ रुपये, जास्तीत जास्त ८५० रुपये तर सरासरी ६०० रुपये दराने विकला गेला, तर याउलट लाल कांदा दराच्या तुलनेत उन्हाळी कांद्यांचे दर तिनशे ते चारशे रुपयांनी जास्त असून, त्यांना कमीत कमी ४०० रुपये, जास्तीत जास्त १२०१ रुपये, तर सरासरी ९५० रुपयांपर्यंत विकला गेला. बाजार आवारात १८०० ट्रॅक्टर, ३५० पिकअप आदी वाहनांमधून सुमारे तीस ते पस्तीस हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.
 

Web Title: Red onion prices fall by Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.