लाल कांद्याची घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:50 IST2020-03-17T22:50:16+5:302020-03-17T22:50:41+5:30
वणी : उपबाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, लाल कांद्याची घडली आहे. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला १९३७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ४४१ वाहनांमधून दहा हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला कमाल १९३७, किमान १३००, तर सरासरी १६०० रु पये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. लाल कांदा अत्यल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. लाल कांदा खरेदीसाठी व्यापारीवर्ग अनुकूल नसतो. कारण तो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याची साठवण करण्याबाबत निरुत्साह दिसून येते. बांग्लादेशमध्ये कांद्याची निर्यात केल्याची माहिती मनीष बोरा व मनोज चोपडा यांनी दिली. गोल्फ कंट्रीबरोबर कोलंबो, मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी निर्यात करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात सुरू करून कांदा उत्पादकांना दिलासा दिला; मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे कांदा खरेदी करणाऱ्या परदेशीय बाजारपेठा मंदावल्या आहेत.रोज खरेदी व अल्प नफ्यात विक्र ी असे हे गणित असते. त्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने व्यापारीवर्गाचा त्याकडे कल वाढला आहे. टिकाऊ साठवणुकीस योग्य व लवकर खराब न होणारा अशी या कांद्याची ओळख आहे. दरम्यान, निर्यात सुरू झाल्यानंतर व्यापारीवर्गाबरोबर शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.