लाल कांदाही मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:17 IST2019-02-07T18:16:20+5:302019-02-07T18:17:50+5:30
अतिशय प्रतिकूल परिस्थतीत यंदा शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे पीक घेतले होते; मात्र उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.

लाल कांदाही मातीमोल
नायगाव : अतिशय प्रतिकूल परिस्थतीत यंदा शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे पीक घेतले होते; मात्र उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.
कांद्याच्या दोन्ही हंगामात शेतकºयांच्या पदरी निराशाच आल्याने बळीराजा सध्या दुष्काळात तेरावा ....अनुभवत आहे. अशा बिकट परिस्थतीत शासनाने अटी-शर्ती लादून तोकडे अनुदान देऊन बळीराजा हतबल झाला आहे. अत्यल्प पडलेल्या पावसाच्या पाण्यावर शेतकºयांनी लाल कांद्याची लागवड केली. त्यातही अनेक शेतकºयांनी लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र पाण्याअभावी सोडून दिले. त्यामुळे मशागत, रोपे, खते-औषधे आदी खर्चाचा भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागला. अशा प्रतिकूल परिस्थतीत जेमतेम क्षेत्रावर पिकविलेल्या कांद्यालाही बाजारात मातीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सिन्नर तालुक्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असणाºया नायगाव खोºयातील शेतकरी आधीच उन्हाळ कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्याने साठवून ठेवलेला कांदा सध्या मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. परिसरातील देशवंडी, जायगाव, नायगाव, जोगलटेंभी व सोनगिरी आदी गावात आजही हजारो क्विंटल साठविलेला कांदा चाळीतच सडतो आहे.
अशा परिस्थतीतच लाल कांद्याचा उत्पादन खर्चही फिटण्या इतकेही पैसे पदरात पडत नसल्याने आज ना उद्या भावात सुधारणा होईल या आशेवर शेतातच ठेवलेल्या कांद्याला शेतातच मोड फुटून हे कांदे सडू लागले आहे.
एकीकडे शेतकरी दुष्काळी परिस्थितीने होरपळत आहे, तर दुसरीकडे कांद्याने डोळ्यात पाणी आणल्याने बळीराजा सध्या दुष्काळात तेरावा महिना अनुभवत आहे.