शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात पोलिसांची रस्ता अडवून वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:16 IST

गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यापासून शहरात पोलिसांची वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी धडक मोहीम सुरू आहे. परंतु, ही मोहीम राबविताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांवर कारवाई करीत असताना पोलीस यंत्रणा स्वत:च नियमांकडे काणाडोळा करीत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एबीबी सर्कल येथे मंगळवारी (दि. २०) वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी सिग्नलवरून डावे वळण पूर्णपणे अडवून रिक्षाचालकांवर तपासणी मोहीम राबविली.  पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेमुळे ठक्कर डोम आणि सिटी सेंटर मॉलकडे जाणारा रस्ता पोलिसांमुळे अडवला गेल्याने वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेकांना काही क्षण थांबून पोलिसांना विनंती करूनपुढे जावे लागले. तर काही दुचाकीस्वारांना पोलिसांच्या गर्दीतून कसरत करून वाहन पुढे न्यावे लागले. याठिकाणी नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाºया रिक्षाचालकांसह आवश्यक कागदपत्र व परवाने नसलेल्या रिक्षाचालकांना अडवून त्यांची तपासणी सुरू असल्याने पोलिसांनी अडवलेल्या रिक्षांची गर्दी आणि सुमारे ९ ते १० पोलीस कर्मचारी व अधिकाºयांनी रस्त्यावर उभे राहून कारवाई केल्याने डावे वळण घेऊन जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने या रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे शहारातील सिग्नलवर डावे वळन वाहनांना न थांबता वळण्यासाठी असल्याने या ठिकाणी वाहनचालक वेगात जात असताना रस्त्यात पोलीस उभे असल्यामुळे त्यांनी अचानक वाहनांना ब्रेक लावले लागत असल्याने काही वाहनांचे अपघात होतानाही वाचल्याचे दिसून आले.सिग्नलकडे पोलिसांचे दुर्लक्षहेल्मेट आणि रिक्षाचालकांवर कारवाई करताना एबीबी सर्कलवर असलेल्या सिग्नलकडे पोलिसांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. रिक्षाचालकांच्या तपासणीसाठी सुरू असेल्या मोहिमेत रिक्षाचालकांना अडवतानाच पोलिसांनी डाव्या वळणावर गप्पांची मैफलही रंगवली होती. त्यामुळे डाव्या वळणाने ठक्कर डोमकडे जाणाºया वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसNashikनाशिक