सटाण्यात मक्याला विक्रमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:49 IST2019-02-01T17:49:06+5:302019-02-01T17:49:28+5:30
तेजी : उन्हाळ-लाल कांद्याचीही आवक

सटाण्यात मक्याला विक्रमी भाव
सटाणा : गेल्या काही दिवसात मक्याला चांगलीच तेजी आली असून सटाणा बाजार समितीत सर्वाधिक प्रती क्विंटल २००१ रु पये मक्याला विक्र मी भाव मिळाला तर सरासरी १९७५ रुपये भाव राहिला.
येथील बाजार समिती आवारात शुक्र वारी (दि.१) मक्याची सरासरी ८०० क्विंटल आवक झाली होती. गेल्या चार दिवसांपासून मक्याला तेजी आली असून अचानक शंभर ते सव्वाशे रु पयांनी मक्याचे भाव वाढले आहेत. शुक्रवारी मक्याला सर्वाधिक प्रती क्विंटल २००१ रु पये भाव तर सरासरी १९७५ रु पये भाव होता. दरम्यान बाजरी ,गहू देखील तेजीत असून बाजरी प्रती क्विंटल २२०० रु पये तर गहू २३५० रु पये भावने विकला गेला. दरम्यान उन्हाळी व लाल कांद्याची मोठ्याप्रमाणात आवक सुरु आहे. उन्हाळ कांद्याची १६०० क्विंटल इतकी आवक होती.तर लाल कांद्याची ९ हजार क्विंटल इतकी आवक झाली. दरम्यान चांगल्या प्रतीच्या उन्हाळ कांद्याला २५० रूपये प्रती क्विंटल भाव मिळाला. खराब कांदा मात्र व्यापारी नाकारत असल्यामुळे शेतकरी बांधवानी कांदा प्रतवारी करून बाजार समिती आवारात आणावा, असे आवाहन सभापती मंगला सोनवणे यांनी केले आहे. लाल कांद्याची आवक कमी झाली आहे.त्यामुळे भावात सुधारणा झाली असून ५५० रुपयांपर्यंत कांदा विकला गेला.