शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सहावी योजना हस्तांतरणास मान्यता

By admin | Updated: January 14, 2016 00:10 IST

अटी-शर्तींवर एकमत : बांधकाम परवानगीचे अधिकार मनपाकडे

सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सहाव्या योजनेच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला असून, घर बांधकाम परवानगीचे अधिकार हे आता मनपाकडे राहणार आहेत. याबाबत सिडको व महापालिका प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. यात अटी-शर्ती मान्य करून हस्तांतरणाबाबत एकमत होऊन शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे यापुढील काळात सिडकोकडे फक्त घर हस्तांतरण व ना-हरकत दाखला देण्याचेच अधिकार राहणार आहेत.सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेऊन त्या जागेवर टप्प्या-टप्प्याने योजना क्रमांक एक ते सहाची निर्मिती केली. यातील एक ते पाच योजना या मनपाकडे या आधीच हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. परंतु सहावी योजना मात्र अद्यापही सिडकोच्याच ताब्यात आहे. एक ते सहा योजनांतील घराची बांधकाम परवानगी, ना हरकत दाखला, घर हस्तांतरण करण्याचे अधिकारही सिडकोकडेच आहेत. यामुळे सिडको भागातील वाढलेले अतिक्रमण काढण्याची वेळ आल्यानंतर मनपा व सिडको प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवित असे.सिडको प्रशासनाच्या ताब्यातील सहावी योजना ही मनपाकडे हस्तांतरित करावी यासाठी अनेकदा बैठका झाल्या परंतु प्रश्न मार्गी लागत नव्हता. यामुळे सहाव्या योजनेतील नागरिकांना मूलभूत समस्यांसाठीदेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेरीस सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर व महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि सिडकोतील नगरसेवक यांच्यात बैठक झाली. दोन्ही बाजूंकडील अटी-शर्तींबाबत चर्चा झाली. यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचे समजते. या बैठकीत सिडको प्रशासन हे त्यांच्या ताब्यातील सहावी योजना मनपाकडे हस्तांतरित करणार आहे. तसेच सिडको विशेष नियोजन प्राधिकरणाचे सर्व अधिकारही मनपाकडे हस्तांतरित करणार आहे. या बदल्यात सिडको मनपाला कोणतीही रक्कम न देता विना मोबदला सिडकोच्या ताब्यातील दोन कम्युनिटी हॉल, लेखानगर येथील नर्सरी तसेच त्यांच्याकडील मोकळे भूखंड याबरोबरच सिडकोकडील इमारतींचे थकीत भाडे माफ करणार आहे. यावर एकमत झाले असून सिडको व मनपा यांनी त्यास तत्त्वत: मान्यताही दिली आहे. यावर शासनाकडून अंतिम निर्णय येताच सहावी योजना हस्तांतरण व बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेकडे देण्यात येणार आहेत. (वार्ताहर)