शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या, अन्यथा कप बशी फुटली अन्...’

By अझहर शेख | Published: August 11, 2020 2:01 PM

सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या.

ठळक मुद्देकप बशी फुटली अन् थोडक्यात हौस फिटलीआकर्षक ‘ऑफर’ देणारा इमेल: कामापुरता मामा.., स्वत:हुन इतरांना आपला ‘ओटीपी’ सांगता: एका हाताने टाळी वाजत नाही...

नाशिक : ‘सायबर सुरक्षेच्या या म्हणी पाठ करुन घ्या अन्यथा कप बशी फुटली अन् थोडक्यात हौस फिटली...’, आकर्षक ‘ऑफर’ देणारा इमेल: कामापुरता मामा.., जेव्हा तुम्ही स्वत:हुन इतरांना आपला ‘ओटीपी’ सांगता: एका हाताने टाळी वाजत नाही..., अशा गंमतीदारपणे राज्याच्या पोलीस दलाने प्रबोधनात्मक आगळ्यावेगळ्या काही म्हणी आपल्या टिवट्र अकाउंटवरून पोस्ट केल्या आहेत. या म्हणी नेटीझन्समध्ये मंगळवारी (दि.११) चांगल्याच चर्चेत आल्या.सायबर गुन्हेगारांकडून देशभरात विविध शहरांमध्ये नागरिकांची हजारो ते लाखो रुपयांपर्यंत दररोज फसवणूक केली जात आहे. या आर्थिक फसवणुकीचा आकडा चक्रावून टाकणारा असून कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊ न काळात यामध्ये अधिकच वेगाने वाढ झाली. याबाबत ‘युनो’नेसुध्दा काही दिवसांपुर्वीच लक्ष वेधले होते. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिकांनी सापडू नये, यासाठी सोशलमिडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र पोलीस दला’ने काही प्रबोधनपर गंमतीदार ‘सायबर सुरक्षा म्हणी’ पोस्ट केल्या आहेत. या म्हणी दिवसभर सोशलमिडियामध्ये व्हायरल होत होत्या.लॉकडाऊन काळात नाशिककरांना अशाच पध्दतीने सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवून सुमारे ४ कोटी रुपयांपर्यंत गंडा घातल्याचे समोर आले आहे. एकूणच राज्यभरात अशा ऑनलाइनआर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांचा आकडा गंभीर आहे. हे गुन्हेगार शोधून गजाआड करणे पोलीस दलापुढेदेखील एक आव्हान आहे. गुन्हेगारांची परराज्यांमध्ये आढळून आलेली ‘लिंक’ त्यासाठी मर्यादा ठरते. तसेच विविध तांत्रिक अडचणींमुळेही या गुन्ह्यांच्या उकल होण्याचे प्रमाण नाशिकसह राज्यातील सर्वच शहरांमध्ये तसे अत्यल्प आहे.नागरिकांनी सावधगिरी बाळगली तर ऑनलाइनआर्थिक गुन्हेगारीला आळा नक्कीच बसू शकतो, असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जातो. पोलिसांकडून ‘सायबर सुरक्षा’विषयी वेळोवेळी नागरिकांना सतर्क केले जाते. तसेच बॅँकांकडूनसुध्दा आपल्या ग्राहकांना लघुसंदेशाद्वारे याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न होतो; मात्र असे असतानाही सायबर गुन्ह्यांमध्ये कुठल्याहीप्रकारची घट झाल्याचे अद्याप आढळून येत नाही.

टॅग्स :Policeपोलिसcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीNashikनाशिक