मार्च महिन्याचे नियंत्रित साखरेचे नियतन प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:11 IST2018-03-22T23:11:57+5:302018-03-22T23:11:57+5:30
मालेगाव : जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांच्याकडून धान्य वितरण अधिकारी मालेगावकरिता मार्च २०१८ मध्ये साखरेचे नियंत्रित नियतन मंजूर करण्यात आले आहे.

मार्च महिन्याचे नियंत्रित साखरेचे नियतन प्राप्त
मालेगाव : जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक यांच्याकडून धान्य वितरण अधिकारी मालेगावकरिता मार्च २०१८ मध्ये साखरेचे नियंत्रित नियतन मंजूर करण्यात आले आहे. धान्य वितरण अधिकारी मालेगाव शहराकरिता फक्त अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड एक किलो साखर याप्रमाणे प्राप्त झालेले असून, वाटप व विक्री दर पुढीलप्रमाणे आहे. शहरासाठी अंत्योदय शिधापत्रिकाधारक वाटपाचे प्रमाण एक किलो सारखेचा दर २० रुपये आहे. मार्च २०१८ मध्ये साखर फक्त अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी असून, प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांसाठी नाही, असे धान्य वितरण अधिकारी मालेगाव यांनी कळविले आहे.