मूठभरधान्यासह एक रुपया फेरीने विद्रोही संमेलनाची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:32 IST2021-02-24T23:23:56+5:302021-02-25T01:32:58+5:30
नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला.

मूठभरधान्यासह एक रुपया फेरीने विद्रोही संमेलनाची मोहीम
नाशिक : संविधान सन्मानार्थ होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी ह्यमूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठीह्ण या मोहिमेला नाशिकरोड, जेलरोड परिसरात प्रारंभ करण्यात आला.
जेलरोड परिसरात कोविड नियम पाळत वेगवेगळ्या ठिकाणी चार-चारचे गट करून मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी भीमनगरच्या स्थानिक नागरिक - महिला व छोटे दुकानदार, फळ विक्रेते यांनी यावेळी १ ते १०० रुपयांपर्यंतची मदत संमेलनासाठी दान पेटीत दिली. तर स्थानिक महिलांनी तांदूळ - गहू झोळी मध्ये टाकत संमेलनाला सहभागी होण्याचा निर्धार केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी संमेलनासह मोहिमेचे पत्रक वाटप केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, कामगार नेते आनंद गांगुर्डे, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, अयाज अकबर खान, सारा वाळुंजकर, मुख्य विश्वस्त गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, रवींद्र पगारे, राज निकाळे, दादाभाई शिंदे, राजू गायकवाड, डॉ. अनिल सोनवणे, कय्यूम शेख, किरण दोंदे, बिलाल शेख, शाहरुख खान, जावेद शेख, रफिक टकारी, भारत कर्डक, हर्षल मोरे, दीपक कुमार, तोफिक शेख, सुरेखा कर्डक, यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.