‘अखिल’ की ‘आखिल’ होईना बोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:39+5:302021-02-05T05:45:39+5:30

धनंजय रिसोडकर नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय ...

Realization of 'Akhil' not 'Akhil'! | ‘अखिल’ की ‘आखिल’ होईना बोध !

‘अखिल’ की ‘आखिल’ होईना बोध !

धनंजय रिसोडकर

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणे हे शिवधनुष्य पेलण्याइतकेच कर्मकठीण कार्य असते. मूळात हा विषय अभिजात साहित्याशी निगडित असल्याने त्यासंबंधीचे प्रत्येक कार्य हे तितक्याच गांभिर्याने होणे अपेक्षित असते. मात्र, शनिवारी जेव्हा संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोधचिन्हावर दोन ठिकाणी असलेला उल्लेख खालील बाजूस ‘अखिल’ तर वरील बाजूस ‘आखिल’ असा करण्यात आल्याचे दिसून आले. जे बोधचिन्ह संपूर्ण राज्यात, देशात आणि समाजमाध्यमांतून संपूर्ण विश्वात पोहोचणार आहे, त्या संमेलनातील बोधचिन्हच जर शुद्धलेखनाचे तारतम्य ना? बाळगता होत असेल, तर त्या संमेलनातील पुढील व्यापात मराठी भाषेचाच तर बोजवारा उडणार नाही ना? अशी आशंका साहित्यप्रेमींच्या मनी आल्यास आणि त्यातून नक्की काय बोध घ्यायचा, असा प्रश्न रसिकांच्या मनात आल्यास नवल नाही.

नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची गत आठवडाभरापासूनच सर्व रसिक वाट बघत होते. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शनिवारी करण्यात आले. संमेलनाचे बोधचिन्ह हा त्या संमेलनाचा चेहरा मानला जातो. त्यामुळे त्या बोधचिन्हाच्या निर्मितीसाठी स्पर्धा घेऊन राज्यभरातील कलाकारांना आवाहन करण्यात आले, त्यानुसार ते तयार होणे आणि सर्व कलाकारांच्या प्रवेशिका पोहोचल्यानंतर त्यांचे योग्य ते परीक्षण होण्यासाठी काही कालावधी हा निश्चितपणे लागणार होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्षांच्या निवडीपर्यंतदेखील बोधचिन्हाचे अनावरण झाले नसले तरी गुणवत्तापूर्ण कार्यासाठी हा विलंब साहजिकच आहे, असेच मानले गेले. मात्र, या बोधचिन्हाचे अनावरण करून ते सर्व प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी या बोधचिन्हाच्या निवड समितीने तसेच आयोजक संस्थेच्या धुरीणांनी त्या चिन्हाचे बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित होते.

इन्फो

मूळ बोधचिन्हाला नंतर जोड

साहित्य संमेलनाच्या मूळ बोधचिन्हात खालील बाजूस एकदाच ‘अखिल’चा उल्लेख असून तो योग्यदेखील होता. मात्र, त्यानंतर त्यात आयोजक संस्थेचे नाव बोधचिन्हाच्या वरील भागात जोडण्यात आले आहे. ते करताना त्या ठिकाणी लिहिलेला ‘आखिल‘ हा शब्द साहित्यप्रेमींना नक्कीच खटकणारा आहे.

इन्फो

‘महा’देखील गायब

या बोधचिन्हाला नंतर वरील भागात जोड देताना अखिल भारतीय मराठी साहित्य ‘महा’मंडळ असा उल्लेख अपेक्षित असताना प्रत्यक्षात नव्याने करण्यात आलेल्या बोधचिन्हात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील ‘महा’ शब्दच गायब झाल्याचे चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून सुटत नाही. मूळ बोधचिन्हाला जोड देताना त्यात अशी घिसाडघाई करून संमेलनाच्या बोधचिन्हातच चुका करणे अक्षम्य ठरते.

फोटो

३०बोधचिन्ह

३०बोधचिन्ह २

Web Title: Realization of 'Akhil' not 'Akhil'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.