शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी वाचनात ठीक, गणितात जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:51 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या ‘असर’ संस्थेने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभागाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास करणाऱ्या ‘असर’ संस्थेने केलेल्या पाहणीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण विभागाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. गणितात विद्यार्थी अपेक्षित प्रगती करू शकलेले नाही, तर वाचनामध्ये अजूनही प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. संस्थेच्या अहवालातील आकडे अगदीच कमी नसले तरी वाचन आणि गणितात ५० टक्केदेखील आकडेवारी नसल्याने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची चिंता नक्कीच वाढणार आहे.मागील तीन वर्षांपासून राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासंदर्भातील हा अहवाल असून, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणपद्धतीवर यात अभ्यास करण्यात आला आहे. संस्कार आणि शिक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा स्तर विचारात घेतला जातो. यंदादेखील सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ‘अ‍ॅन्युअल स्टेट््स आॅफ एज्युकेशन रिपोर्ट’ अर्थात ‘असर’ या संस्थेने केलेल्या पाहणीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ३.५ टक्के इतके आहे, तर वाचनामध्ये जिल्हा परिषदेतील शाळांमधील मुलांची प्रगती समाधानकारक आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीमधील ६१.५ टक्के विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची क्षमता आहे, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या ८१.२ मुलांना वाचता येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.या उलट परिस्थिती मात्र गणिताची आहे. गणितामध्ये अद्यापही मुलांनी अपेक्षित रूची दाखविलेली नाही. जवळपास ४२.३ टक्के मुलांना वजाबाकी करता येत नाही, तर ३२.१ टक्के विद्यार्थी अद्यापही भागाकार करू शकत नसल्याचे वास्तव समोर आलेले आहे.शैक्षणिक हब म्हणून नाशिकच्या शिक्षणविभागाकडे पाहिले जात असताना गणितामध्ये विद्यार्थी बेअसर झाल्याचे दिसून आले.चार टप्प्यांत सर्वेक्षणशिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाºया सामाजिक संस्थेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो. राष्टÑीय पातळीवर ही पाहणी केली जाते. महाराष्टÑात ३३ जिल्ह्यांतील ९९० गावांमधील ११ हजार ७६५ घरांमध्ये करण्यात आले आहे. जानेवारी ते एप्रिल २०१८ पर्यंत अध्ययनस्तर निश्चितीचे चार टप्पे तसेच या सत्रात दोन टप्पे करून अध्ययनस्तर निश्चितीनंतर कृती कार्यक्रम व त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका, केंद्रनिहाय मंथन सभा घेण्यात आल्या आहेत. विशेषत: वाचन आणि गणित विषयावर अहवाल देण्यात आलेला आहे.शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांच्या बरोबरीने अधिकाºयांची भूमिकादेखील महत्त्वाची असल्याने या तीनही घटकांच्या गुणवत्ता तपासणीसाठी उपक्रम राबविला जातो.  अधिकाºयांमध्ये शिक्षण विषयक जाणीव समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यामध्ये शाळा भेटी कशा कराव्यात याचे मार्गदर्शन केले जाते.  शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे निर्णय हे विद्यार्थीभिमुख असावे यासाठी शैक्षणिक स्तरावर गुणवत्ता पूर्ण अध्ययनाबाबत अभ्यास करण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा