वाचन प्रेरणा दिनवैनतेय विद्यालयात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:58 IST2020-10-17T18:57:35+5:302020-10-17T18:58:09+5:30
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्र माप्रसंगी व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्तमधुकरमाणकेश्वर वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर, विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वैनतेय विद्यालयात आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करतांना डी. बी.वाघ सोबत मधुकर राऊत, दत्ता उगावकर, एस. पी. गोरवे, बी. आर. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी.
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्र माप्रसंगी व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मधुकर माणकेश्वर वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर, विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्तविक एस. एस. कापसे यांनी केले. या वाचन प्रेरणा दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी सोनवणे आणि नेहरिन पठाण यांनी संस्कृत भाषेमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली.
याप्रसंगी प्राचार्य डी. बी.वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, रशीद पठाण यांची भाषणे झाली. भारती लंबाते, बा. बा. गुंजाळ, बाळकृष्ण ठोके आदींसह शिक्षक उपस्थित होते.