Re-flow the river | कºहा नदी पुनर्प्रवाहित करा

निफाड तालुक्यातील कºहा नदीपात्राची पाहणी करताना जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह. समवेत गोपाळ पाटील व परिसरातील नागरिक.

ठळक मुद्देराजेंद्र सिंह : गाळ काढण्याचे आवाहन

काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील नांदुर्डी, रानवड, सावरगाव, नांदूर खुर्द, रेडगाव या परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कºहा नदीपात्राची जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी पाहणी करत नदीला पुन्हा बारमाही प्रवाहित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
चांदवड तालुक्यातील धोडप डोंगर रांगांमध्ये उगम पाहून निफाड तालुक्यातील विनता नदीमध्ये विलीन होणारी सुमारे पंचवीस किलोमीटर लांबीची कºहा नदी ही रेडगाव, नांदूर खुर्द, सावरगाव, रानवड, नांदुर्डी या परिसरातील हजारो हेक्टर कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी ठरलेली आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या नदीमध्ये सातत्याने गाळ साचत जाऊन नदीचे रूप नष्ट झाले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नदीला पुनर्जीवित करण्यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांना परिसराची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
नदीला मिळणारे छोटे छोटे नाले, तलाव, वसंत बंधारे यांची दुरु स्ती व बांधबंदिस्ती याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी डॉ. पारसमल भंडारी, रामचंद्र कुंभार्डे, बोराडे, शिवाजी निफाडे, लक्ष्मण निकम, भाऊसाहेब हिरे, अनिल भंडारी, नंदू शिंदे, संजय शिंदे उपस्थित होते.या भेटीदरम्यान राजेंद्र सिंह यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करून कºहा नदी पुन्हा प्रवाहित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. नदीमध्ये साठलेला गाळ काढणे व जमिनीत पाणी जास्तीत जास्त कसे मुरेल याकडे लक्ष द्यावे. नदीमध्ये कुठल्याही प्रकारचे सांडपाणी व केरकचरा जाणार नाही यासाठी नियोजन करावे.

Web Title: Re-flow the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.