मुंजवाडच्या पाडगण शिवरात बिबट्याचे पुन्हा आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:23 IST2020-08-08T18:22:23+5:302020-08-08T18:23:07+5:30

मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Re-arrival of leopard in Padgan Shivar of Munjwad | मुंजवाडच्या पाडगण शिवरात बिबट्याचे पुन्हा आगमन

गत एक महीन्यापूर्वी पाडगण शिवारात बिबट्याने दहशत पसरवल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला होता.

ठळक मुद्देशेतकºयाच्या डाळींब बागेत कामगारांना बिबट्या दिसला होता.

मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
गेल्या एक महीन्यापूर्वी पाडगण शिवारातील बापू जाधव या शेतकºयाच्या डाळींब बागेत कामगारांना बिबट्या दिसला होता. त्यावेळी ज्योतीराव गांगुर्डे, राहूल माळी, भाऊसाहेब माळी यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. तसेच बापू जाधव यांच्या पाळीव कुत्र्यासह परिसरातील अनेक शेतकºयांचे कुत्री देखील त्यावेळी गायब झाले होते. त्यावेळी वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी आठ दिवस पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या पिंजºयात अडकला नाही. मध्यंतरी बिबट्या कंधाणे परिसराकडे गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच कंधाणे येथील तरूणावर रात्रीच्या वेळेस बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.
शुक्र वारी रात्री नऊ वाजता बापू जाधव यांचा मुलगा घराजवळच असलेल्या गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला असता त्याला बिबट्या दबा धरून बसल्याचे दिसताच त्याने वडीलांना आवाज देऊन बोलवून घेतले जोराने आरडा ओरड करूनही बिबट्या हलत नसल्याने त्यांनी फटाके फोडून बिबट्यास पळवून लावले. त्यानंतर तात्काळ त्यांनी बिबटया आल्याची बातमी परिसरातील शेतकºयांना फोन करून सांगून सावध केले.
गत दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसततील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहीती वन विभागाच्या कर्मचाºयांना देण्यात आली असून या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Re-arrival of leopard in Padgan Shivar of Munjwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.