शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा  रेशनचा तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:37 IST

रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे.

मालेगाव : रेशनिंगचा २३० क्विंटल (४६० गोण्या) तांदूळ कंटेनरमध्ये भरून धुळ्याकडून मुंबई येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरचालक सुनील महादेव कोल्हार, रा. कापशी, ता. आष्टी, जि. बीड याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी कंटेनरसह तांदूळ ताब्यात घेतला आहे. येथील महसूल विभागाकडून तांदूळाची पडताळणी करण्यात आली असून, सदरचा तांदूळ रेशनिंगचा असल्याचे उघडकीस आले आहे.धुळे येथून मुंबईकडे रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, हवालदार किशोर नेरकर यांना मिळाली होती. त्यानुसार चंदनपुरी शिवारातील मनमाड चौफुलीवर किल्ला पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एमएच ४६ एएच २१२८) ही अडवून त्याची तपासणी केली. कंटेनरमध्ये ५० किलो वजनाचा तांदूळ पांढºया रंगाच्या पिशवीत भरलेल्या आढळून आल्या. सदर तांदुळाबाबत चालक सुनील कोल्हार याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कंटेनरमध्ये ४६० गोण्या (२३० क्विंटल) तांदूळ मिळून आला. किल्ला पोलिसांनी येथील तहसीलदार ज्योती देवरे, पुरवठा शाखेचे पुरवठा अधिकारी सावणे यांच्याकडून तपासणी करून घेतली.  सदरचा तांदूळ रेशनिंगचा असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.  सदर कारवाई पोलीस निरीक्षक पटारे, नेरकर, पोलीस उपनिरीक्षक डोखे, हवालदार दिपक पाटील, निलेश निकाळे, रतिलाल राठोड आदिंनी केली. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात जीवनावश्यक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल धुळे येथील जय आनंद फुट इंडस्ट्रीज युनिट ३ चा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिसNashikनाशिक