द्राक्ष बागांच्या छाटणीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 14:50 IST2018-10-19T14:50:45+5:302018-10-19T14:50:52+5:30
खेडलेझुंगे : द्राक्षपंढरी म्हणुन नावलौकीक असलेल्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रूई, धारणगांव परिसरात द्राक्ष बागांच्या छाटणीस वेग आला आहे. यावर्षी कमी प्रमाणात आणि बेमोसमी पावसामुळे छाटण्या उशीरा होत आहे. एरवी आॅगस्ट मिहन्याच्या दुसर्या आठवड्यात छाटण्यांची सुरवात होवून सप्टेंबर अखेर छाटण्यांचे कामकाज पुर्णत्वास येत असते.

द्राक्ष बागांच्या छाटणीस वेग
खेडलेझुंगे : द्राक्षपंढरी म्हणुन नावलौकीक असलेल्या निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, रूई, धारणगांव परिसरात द्राक्ष बागांच्या छाटणीस वेग आला आहे. यावर्षी कमी प्रमाणात आणि बेमोसमी पावसामुळे छाटण्या उशीरा होत आहे. एरवी आॅगस्ट मिहन्याच्या दुसर्या आठवड्यात छाटण्यांची सुरवात होवून सप्टेंबर अखेर छाटण्यांचे कामकाज पुर्णत्वास येत असते. एप्रिल महिन्याच्या खरड छाटणी ते आॅक्टोंबरच्या फळबहार छाटणीपर्यंतचा काळ हा विश्रांतीचा काळ असतो. या कालावधीत विविध खते देवून काडी परिपक्व करण्यावर शेतकऱ्यांचा कल असतो. यंदा द्राबागांची काडी चांगली परिपक्व असल्याने शेतकºयांना त्याचा फायदाच होणार असल्याचे चिन्ह आहेत. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे द्राक्षबागांचे पुढचे नियोजन अत्यंत अवघड व जिकरीचे होणार आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्षबागाचे उत्पादन आजच्या स्थितीवरु न रामभरोसे आहे. हवामान खात्याकडुन मिळणारे पावसाचे अंदाज आणि सोशल मिडीयावर व्हायरल होणारे वातावरण बदलाचे संदेश यांमुळे शेतकरी वर्गात फळबाग छाटणीबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे चिन्ह आहे. पावसाचे अंदाज फोल ठरत असल्यानेच आॅगस्ट महिन्याच्या दुसºयाआठवड्यात सुरु होणारे छाटणीचे कामकाज हे आॅक्टोंबर महिना उजाडला आहे तरी सुरु आहे. सर्वत्र एकाच वेळेस सुरु झालेल्या छाटणीमुळे मजुर मिळणे ही अवघड झालेले आहे. त्यातच मागील वर्षापेक्षा मजुरीचे दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसुन येत आहे.