जिव्हाळेत ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 01:25 IST2021-02-19T21:39:48+5:302021-02-20T01:25:10+5:30

कसबे सुकेणे : दीक्षी वीज उपकेंद्रातून दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे या गावांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने, संतप्त नागरिकांनी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुयोग गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओझर-सुकेणे रस्त्यावर जिव्हाळे येथे रास्ता रोको करत निवेदन दिले.

Rasta Rocco movement of villagers in Jivhale | जिव्हाळेत ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

जिव्हाळेत ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

ठळक मुद्दे अनियमित वीजपुरवठा : अभियंत्यांना निवेदन

दिक्षी वीज उपकेंद्राला आडगाव येथून वीजपुरवठा करण्यात येतो, हा वीजपुरवठा ओझर येथून जोडून मिळावा, वीज भारनियमनाच्या वेळा बदलून मिळाव्या, या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी दिक्षी वीज उपकेंद्रांच्या कनिष्ठ अभियंता मोरे यांना देण्यात आले. यावेळी ओझर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, अनिरुद्ध पवार, किशोर पागेरे, रमेश धनवटे, रमेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Rasta Rocco movement of villagers in Jivhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.