रासलीलेतील नृत्याविष्काराचे.तपोवनात रासलीलेस प्रारंभ
By Admin | Updated: August 22, 2015 00:03 IST2015-08-22T00:03:06+5:302015-08-22T00:03:48+5:30
रासलीलेतील नृत्याविष्काराचे.तपोवनात रासलीलेस प्रारंभ

रासलीलेतील नृत्याविष्काराचे.तपोवनात रासलीलेस प्रारंभ
नाशिक : श्री लक्ष्मीनारायण अमृतकुंभ महोत्सवांतर्गत आयोजित वृंदावन येथील स्वामी पप्पनजी भरद्वाज यांच्या रासलीला कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी राधा-कृष्णाच्या भावभक्तीने ओथंबलेल्या प्रसंगांनी व त्याला लाभलेल्या नृत्याविष्काराच्या साथीने उपस्थितांची मने जिंकली.
लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट व विष्णूप्रसाद पोद्दार परिवाराच्या वतीने आयोजित या रासलीला कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत रामस्नेहीदास, महंत गोपीकृष्णदास, खुशालभाई पोद्दार आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. आयुष पोद्दार, हितेश पोद्दार यांनी सर्वांचे स्वागत केले. महेंद्र पोद्दार यांनी सूत्रसंचालन केले.
तपोवनातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे ३० आॅगस्टपर्यंत संध्याकाळी ७ ते १० यावेळेत सदर बृज लोककला भारती श्रीगिरीराज लीला संस्थानच्या रासलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन राजूभाई पोद्दार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)