सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 01:03 IST2021-10-01T01:02:58+5:302021-10-01T01:03:49+5:30

बलात्काराच्या घटनेने सिडको परिसर सावरत नाही तोच पुन्हा एक पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या एका सावत्र पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.३०) उघडकीस आला.

Rape of a minor daughter by a stepfather | सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सिडको : बलात्काराच्या घटनेने सिडको परिसर सावरत नाही तोच पुन्हा एक पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या एका सावत्र पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.३०) उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी ही तिच्या सावत्र बापाकडून होणाऱ्या जाचाला आणि अत्याचाराला कंटाळून चार दिवसापूर्वी घर सोडून गेली होती. मात्र ती पुन्हा घरी परतल्यानंतर तिने हिंमत करून शेजारी राहणाऱ्या महिलेला घडलेला प्रकार सांगितला असता यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित संशयित सावत्र बापाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेनंतर गुरुवारी (दि.३०) पुन्हा सकाळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याबाबतचे आदेश देत विविध सूचना केल्या.

Web Title: Rape of a minor daughter by a stepfather