अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:20 IST2019-01-18T23:06:43+5:302019-01-19T00:20:57+5:30
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने ओळखीतील त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड भागात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुद्ध पोस्को कायद्यासह बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
नाशिक : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाने ओळखीतील त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना आर्टिलरी सेंटर रोड भागात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुद्ध पोस्को कायद्यासह बलात्काराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती गुरुवारी रात्री ८.३० वाजता घरी असताना तिच्या ओळखीतील अल्पवयीन मुलगा घरात आला. यावेळी मुलगी घरात एकटीच होती.
यावेळी संशयिताने तिला ‘तू क्लासला का येत नाहीस,’ असे विचारून तिचे दोन्ही हात पकडून तिला मिठीत ओढले व तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक तेली करीत आहेत.