रावसाहेब दानवे- चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 10:55 IST2021-11-13T10:54:48+5:302021-11-13T10:55:01+5:30

सातपूर येथील भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिकेच्या शाळा इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेले अवजड उद्योग मंत्री नारायण राणे, आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कार आयोजित केला आहे.

Raosaheb Danve- Chandrakant Patil came in Nashik | रावसाहेब दानवे- चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये दाखल

रावसाहेब दानवे- चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये दाखल

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे,  तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

सातपूर येथील भाजप नगरसेवक दिनकर पाटील यांनी महापालिकेच्या शाळा इमारतीचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेले अवजड उद्योग मंत्री नारायण राणे, आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सत्कार आयोजित केला आहे. आज सकाळी दानवे आणि चंद्रकांत पाटील  दोघेही नाशिक मध्ये दाखल झाले. कार्यक्रमास डॉ. भारती पवार या देखील उपस्थित असून नारायण राणे मात्र दाखल झालेले नाहीत.  दरम्यान, दुपारी चंद्रकांत पाटील हे रामायण या निवासस्थानी सीएनजी गॅस पुरवणाऱ्या एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहेत. तर दुपारी तीन वाजता दानवे आणि चंद्रकांत पाटील वसंत स्मृती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Web Title: Raosaheb Danve- Chandrakant Patil came in Nashik