रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:53 IST2020-08-21T00:50:22+5:302020-08-21T00:53:19+5:30

महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी सौ. रंजना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.

Ranjana Pagare is the first woman Chief Engineer of Nashik Circle | रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता

रंजना पगारे नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता

नाशिक : महावितरण नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी सौ. रंजना पगारे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी त्या रत्नागिरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदावर कार्यरत होत्या. नाशिक परिमंडळाच्या पहिल्या महिला मुख्य अभियंता होण्याचा मान त्यांना मिळाला.
नाशिकच्या रहिवासी असलेल्या पगारे यांनी प्रदीर्घ सेवेत विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. चांदवड विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी सेवेची सुरुवात केली.

Web Title: Ranjana Pagare is the first woman Chief Engineer of Nashik Circle