वृद्धाश्रमात ‘सक्षम’ची रंगपंचमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST2019-03-26T23:55:38+5:302019-03-27T00:10:20+5:30
सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय न करता टाकळी रोडवरील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली.

वृद्धाश्रमात ‘सक्षम’ची रंगपंचमी
नाशिकरोड : सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय न करता टाकळी रोडवरील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत कोरडा रंग खेळत रंगपंचमी साजरी केली.
सक्षम नारी बहुद्देशीय संस्थेच्या महिलांनी टाकळी रोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमात वृद्धांसोबत रंगपंचमी सण साजरा केला. वृद्धांना आपण एकटे आहोत अशी भावना निर्माण होऊ नये म्हणून सक्षम नारी संस्थेच्या महिलांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यावेळी संगीता जगताप, योगिता देवकर, नयना गायकवाड, छाया नवले, तृप्ती बोरा, मनीषा लोढा, नितिका मंत्री, अनुसया गवळी, सुनीता आगळे, प्रमिला जाधव, सुजाता गवांदे, चित्रा हराळे, गीता मिसाळ, माधुरी पढार, वैशाली जोरे, वंदना पाठक आदी उपस्थित होते.