राममंदिर प्रवेशद्वारालगत व्यावसायिकांचे अतिक्र मण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:59 IST2018-05-15T00:59:13+5:302018-05-15T00:59:13+5:30
नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील मोकळ्या जागेवर विविध हातगाड्या तसेच व्यावसायिकांनी अतिक्र मण केल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मंदिरासमोरचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी करूनही मनपा पंचवटी अतिक्र मण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

राममंदिर प्रवेशद्वारालगत व्यावसायिकांचे अतिक्र मण
पंचवटी : नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील मोकळ्या जागेवर विविध हातगाड्या तसेच व्यावसायिकांनी अतिक्र मण केल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मंदिरासमोरचा परिसर मोकळा ठेवावा, अशी मागणी करूनही मनपा पंचवटी अतिक्र मण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी परराज्यातील तसेच राज्यातील शेकडो भाविक दैनंदिन पंचवटीत येत असतात. मंदिरात प्रवेश करतानाच या भाविकांना रस्त्यावर उभ्या राहणाºया रिक्षा, हातगाडे तसेच विविध व्यावसायिकांच्या हातगाड्यांना खेटूनच जावे लागते. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. भर उन्हात भाविक राममंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येते. मंदिराबाहेर गेल्या हातगाडीधारक व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने भाविकांना मंदिरात जाताना अडथळा निर्माण होतो. वाहनतळ नसल्याने भाविक भररस्त्यात, तर कधी ढिकलेनगर समोरील रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने पायी ये-जा करणाºया नागरिकांची अडचण निर्माण होते. राममंदिराबाहेरील रस्ता मोकळा ठेवावा यासाठी नागरिकांनी अनेकदा मनपा प्रशासनाकडे मागणी केली असली, तरी मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने अतिक्र मण हटणार का, असा सवाल परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे.