सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 19:22 IST2019-08-08T19:21:11+5:302019-08-08T19:22:16+5:30
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.

नुकत्याच पारपडलेल्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडी प्रसंगी सरपंच तारा बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य.
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रामचंद्र परदेशी यांची निवड झाली, तर नवनिर्वाचित सरपंच तारा बांबळे यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.
नवनियुक्त सरपंच तारा रतन बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या उपसरपंच निवडीसाठी डॉ. श्रीराम लहामटे व रामचंद्र परदेशी यांनी अर्ज भरले होते. काही वेळानंतर डॉ. लहामटे यांनी माघार घेतल्यानंतर रामचंद्र परदेशी यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. या नंतर त्यांना उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. परदेशी हे ग्रामपंचायतीमध्ये वीस वर्ष सदस्य आहेत.
या वेळी ग्रा. पं. सदस्य विक्र म भांगे, सतिष बांबळे, जगन घोडे, केशव बांबळे, नंदा शिंदे, भिमा धादवड, रोहीणी नांगरे, कविता धोंगडे, लता लहामटे, पौर्णिमा भांगे, सुशिला भवारी तसेच माजी उपसरपंच वृंदा जोशी, रतन बांबळे, नंदकुमार जाधव, शरद भांगे, प्रभाकर गायकवाड, शहाबाज शेख, दत्तु जाधव, हरी कदम, सुनिल गोसावी आदी उपस्थित होते.