शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

By admin | Updated: July 30, 2014 00:20 IST

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

 मालेगाव : शहर-तालुक्यात रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील जवळपास दहा प्रमुख इदगाह मैदानांवर विशेष नमाजपठण करण्यात आले.सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली येथील कॅम्प रस्ता इदगाह मैदानावर प्रमुख नमाजपठण झाले. त्यात जवळपास एक लाख मुस्लीम धर्मीयांनी सहभागी होऊन दुवापठण केले. जवळपास पाऊण तास हे नमाजपठण सुरू होते. आपल्या भाषणात आमदार मौलाना यांनी शांतता व एकात्मतेचा संदेश दिला. नमाजपठणानंतर महसूल व पोलीस प्रशासन तसेच शांतता समितीतर्फे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासह प्रमुख मौलवी व धर्मगुरूंचा फेटा बांधून, हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रांत संदीप पाटील, तहसीलदार दीपक पाटील, शांतता समितीचे दत्ता वडगे, केवळ हिरे, मा. कृ. जोशी आदि उपस्थित होते. कॅम्प इदगाह मैदानासह शहरातील कालीकुट्टी, म्हाळदे मैदान, दरेगाव मैदान आदि प्रमुख दहा इदगाह मैदानावर सकाळी ईदचे नमाजपठण करण्यात आले. त्यात अबालवृद्धासह शहरातील लाखो मुस्लीम धर्मीयांनी सहभाग घेतला. महिलावर्गाने घरी नमाजपठण केले. नमाजनिमित्त इदगाह मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते संरक्षक जाळ्या लावून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नमाज काळात या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. काही स्वयंसेवी संस्थांनी नमाजपठणासाठी जाणाऱ्या मुस्लीम धर्मीयांसाठी पाण्याची व्यवस्था प्रमुख चौकात केली होती. नमाजपठणानंतर सर्व मुस्लीम धर्मीयांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. घरी परतल्यानंतर मित्रपरिवारासह शीरखुर्म्याचा आस्वाद घेण्यात मुस्लीम धर्मीय रममाण झाले होते. रमजान ईदनिमित्त दोन-तीन दिवस शहरातील यंत्रमाग व्यवसायासह इतर छोटे-मोठे उद्योग बंद राहणार आहेत. अनेकजण ईद सणाचा आनंद लुटण्यासाठी सायंकाळनंतर सहकुटुंब सहलीस रवाना झाले. सदर सणानिमित्त शहरात दोन दिवसांपासून अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे.