नाशिक :मुस्लीम बांधवांचा धार्मिकदृष्ट्या पवित्र महिना रमजान पर्वला सोमवारी (दि.५) सुर्यास्तानंतर प्रारंभ होणार आहे. मुस्लीम बांधव मंगळवारी पहाटेपासून रमजानचा पहिला निर्जळी उपवास करणार असल्याचे अधिकृतरित्या रविवारी (दि.४) शाही मशिदीमध्ये झालेल्या चॉँद समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.इस्लामी कालगणनेचा चालू उर्दू महिना शाबानची रविवारी २९ तारीख असल्यामुळे चंद्रदर्शन घडण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र शहरासह संपुर्ण राज्यात कोठेही चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे बैठकीत धर्मगुरूंनी एकमताने निर्णय घेत या महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून सोमवारी रात्री रमजान पर्व काळातील विशेष ‘तरावीह’च्या नमाजपठणाला सुरूवात करण्यात येईल आणि मंगळवारी पहाटेपासून पहिला उपवास (रोजा) सुरू होईल, असे जाहीर केले. यावेळी शहरातील प्रमुख मशिदींचे मुख्य धर्मगुरूंसह चॉँद समितीचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. रमजान पर्वकाळात समाजबांधवांची संपुर्ण दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. मशिदींमध्ये नमाजपठणासाठी दिवसभर गर्दी असते. तसेच रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये ‘तरावीह’ची विशेष सामुहिक नमाज अदा केली जाते. इस्लामी कालगनणा चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे उर्दू महिना चंद्रदर्शन घडल्यानंतर सुरू होतो. महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घडल्यास पुढील महिना मोजला जातो अन्यथा तीस दिवस पुर्ण करत नवा महिना सुरू होतो, म्हणून चंद्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे.
मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:53 IST
रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो.
मंगळवारपासून रमजानचा पहिला उपवास
ठळक मुद्देरविवारी राज्यात कोठेही चंद्रदर्शन घडले नाहीरमजान पर्वला सोमवारी (दि.५) सुर्यास्तानंतर प्रारंभ