राळेगणसिद्धीला तिहेरी मुकूट
By Admin | Updated: August 8, 2014 00:23 IST2014-08-08T00:22:28+5:302014-08-08T00:23:26+5:30
पारनेर : तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत राळेगणसिद्धीच्या मुलांच्या संघांने जेतेपद पटकावले़

राळेगणसिद्धीला तिहेरी मुकूट
पारनेर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित पारनेर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय विद्यालयातील मुलांच्या संघांने चौदा, सतरा, एकोणीस या तीनही वयोगटात जेतेपद पटकावले़ या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे़
पारनेर तालुका क्रीडा संकुलावर बुधवारी व गुरूवारी झालेल्या या स्पर्धांचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिपक नाईक, दादा शेटे, माजी उपसरपंच चंद्रकांत कावरे, आर. डी. औटी व महेंद्र मगर यांच्या हस्ते झाले. राळेगणसिद्धीच्या संत निळोबाराय विद्यालयातील चौदा वर्षे वयोगटातील तेजस मगर, गणेश कुंभार, ऋतिक मापारी, महेश दरेकर, शुभंम पठारे, प्रसाद गायकवाड, आदेश आहेर, ऋषीकेश गोपाळे, तुषार शेटे, राज कामठे, जयराज गोरे, गणेश सांळुके, स्वप्नील टकले यांनी उत्कृष्ट खेळ करून पारनेर, निघोज, वडझिरे संघाना पराभूत केले. वडझिरे येथील जनसेवा विद्यालयाचे दिपक एरंडे, सहादु फुलमाळी, सुयश एरंडे, किरणे आबाणे, सुजीत थोरात, देवेंद्र घोरपडे, तेजस औटी, चेतन फंड, राहुल फुलमाळी यांनी जोरदार झुंज दिली.
सतरा वर्षे वयोगटात संत निळोबाराय विद्यालयाच्या आकाश आदमाने, सुहास नलगे, प्रकाश गवळी, धवलश्री दुश्मन, सौरभ घेनंद, सागर निंबाळकर, स्वप्नील वाळुंज, निखील खेडेकर, आदीत्य बनकर, निलेश वांढेकर यांनी जोरदार खेळ करीत पारनेर न्यू इंग्लीश स्कूलवर मात करीत विजय मिळवला.न्यू इंग्लीश स्कूलच्या राहुल पवार, स्वप्नील दाभाडे, सुरज कानगुडे, राहुल गायकवाड, अक्षय आंग्रे, सचिन रणदिवे, नितीन खाडे, मच्छींद्र जाधव, दिपक बागुल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकोणीस वर्षे वयोगटातही राळेगणसिद्धीच्या संघाने निघोजच्या मुलीका देवी विद्यालय संघाचा पराभव केला. राळेगणसिद्धीचे क्रीडा मार्गदर्शक सोमनाथ वाकचौरे, भाऊसाहेब धावडे, संतोष बर्डे यांच्या कामगिरीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुक केले. यावेळी क्रीडा समितीचे तालुकाध्यक्ष बापुराव होळकर, बाळासाहेब मते, बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब रांधवण, शाहुराव औटी आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)