रक्षाबंधनाचे ताट सजले अन् घरात रक्ताचे पाट वाहिले....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:06+5:302021-09-03T04:16:06+5:30
एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असेच हे गुन्हेगारी कृत्य करत चौघा अल्पवयीन हल्लेखोरांनी राहुलचा काटा काढला. हे खून प्रकरण आता ...

रक्षाबंधनाचे ताट सजले अन् घरात रक्ताचे पाट वाहिले....
एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असेच हे गुन्हेगारी कृत्य करत चौघा अल्पवयीन हल्लेखोरांनी राहुलचा काटा काढला. हे खून प्रकरण आता वेगळ्या वळणावर जात असल्याचे पोलीस तपासातून दिसत आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघा अल्पवयीन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे; मात्र या खुनाचा कट रचणारा मुख्य सूत्रधार हा वेगळा असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विवाहितेचा यापूर्वीचा पती पप्पू राजगिरे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. यानंतर विवाहितेचे राहुलसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. या दोघांमध्ये जवळीक अधिक वाढली आणि हे दोघेही स्वतंत्र खोली घेऊन दत्तनगरमध्ये राहू लागले. ही बाब राजगिरे कुटुंबातील काहींना पटत नव्हती. यामुळे राहुलचा काटा काढू, अशी जीवे मारण्याची धमकीदेखील कुटुंबातील पुरुषांनी दिली होती, असे विवाहित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
---कोट---
पोलिसांच्या तपासात या खुनाचे धागेदोरे उलगडण्यास सुरुवात झाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राहुलच्या खुनामागे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या तसेच हल्लेखोरांना गुन्ह्यासाठी छुपी मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.
- विजय खरात, पोलीस उपायुक्त