वणी मर्चंटस् बॅँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद बाफणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:49 IST2020-03-06T18:49:26+5:302020-03-06T18:49:44+5:30
वणी मर्चंट्स को. आॅप. बँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद देवीचंद बाफणा यांची तर व्हा. चेअरमनपदी हिदायत अकबरखाँ मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली.

वणी मर्चंटस् बॅँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद बाफणा
वणी : वणी मर्चंट्स को. आॅप. बँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद देवीचंद बाफणा यांची तर व्हा. चेअरमनपदी हिदायत अकबरखाँ मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवडणूक सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने तसेच सहकार खात्याचे अधिकारी मिलिंद परदेशी, अरु ण ढोमसे, एस पी गायकवाड, एस. एस. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
चेअरमनपदासाठी सुभाष खाबिया यांनी रिखबचंद बाफना यांचे नाव सुचविले. त्यास नरेंद्र खांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी डॉ. महेंद्र भुतडा यांनी हिदायत मुल्ला यांचे नाव सुचविले तर त्यास विलास कड यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बँकेचे संस्थापक संचालक किसनलाल बोरा यांनी माजी चेअरमन विलास कड व व्हा. चेअरमन प्रकाश सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले तसेच नवनिर्वाचितपदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी किसनलाल बोरा, विलास कड, प्रकाश सोनवणे, महेंद्र भुतडा, सुभाष खाबिया, संजय वाघ, दौलत गावित, अनिता देशमुख, मनीषा वडनेरे, नरेंद्र खांडे, कमलाकर आहेर, महेंद्र बोरा, प्रकाश बोरा, शांतीलाल चोपडा, विजय बोथरा, पारसमल सिसोदिया, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार घिया आदी उपस्थित होते.