सटाण्यात उपनगराध्यक्षपदी राकेश खैरनार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:30 IST2020-12-09T23:47:39+5:302020-12-10T00:30:56+5:30
सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

सटाण्यात उपनगराध्यक्षपदी राकेश खैरनार बिनविरोध
सटाणा :येथील उपनगराध्यक्षपदी राकेश चंद्रक्रांत खैरनार यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे हे रजेवर जात असल्याने त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे खैरनार यांच्याकडे सोपविली.आवर्तन पद्धतीनुसार उपनगराध्यक्ष भारती सूर्यवंशी यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
त्यामुळे बुधवारी ( दि.९) सकाळी ११ वाजता सटाणा नगर परिषदेच्या सभागृहात तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवड घेण्यात आली. खैरनार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी खैरनार यांचा सत्कार केला. तसेच दि.१३ डिसेंबरपर्यंत ते रजेवर जात असल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी खैरनार यांच्याकडे सुपुर्द केली.
यावेळी भारती सूर्यवंशी, राहुल पाटील, महेश देवरे, दीपक पाकळे, मनोहर देवरे, बाळू बागुल, दिनकर सोनवणे, नितीन सोनवणे, सुनीता मोरकर, निर्मला भदाणे, सोनाली बैताडे, संगिता देवरे, रूपाली सोनवणे, सुरेखा बच्छाव, सुवर्णा नंदाळे, पुष्पा सूर्यवंंशी, शमा मन्सुरी, शमिम मुल्ला, आशा भामरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.