राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 16:50 IST2021-04-17T16:49:00+5:302021-04-17T16:50:27+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा कोरोना महामारी असल्यामुळे मागील वर्षीदेखील भरविण्यात आली नव्हती. तसेच या वर्षीसुद्धा कोरोनाचे संकट उभे असल्याने गावात यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती राजुमनबाबा ट्रस्ट व यात्रा कमिटीने सांगितली आहे.

Rajuman Baba Yatra at Rajapur canceled | राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा रद्द

राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा रद्द

ठळक मुद्देहिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील राजुमन बाबा यात्रा कोरोना महामारी असल्यामुळे मागील वर्षीदेखील भरविण्यात आली नव्हती. तसेच या वर्षीसुद्धा कोरोनाचे संकट उभे असल्याने गावात यात्रा भरविण्यात येणार नसल्याची माहिती राजुमनबाबा ट्रस्ट व यात्रा कमिटीने सांगितली आहे.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून राजापूर येथे गुढीपाडवा झाल्यावर पाडव्याची पंचमी या तिथीला दरवर्षी यात्रा साजरी केली जाते. या यात्रेसाठी नाशिक, औरंगाबाद, वैजापूर, मालेगाव, या ठिकाणाहून मुस्लीम बांधव या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित होत असतात.

राजापूर येथील राजुमनबाबा हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून मानले जाते. या यात्रेत आदल्या दिवशी संध्याकाळी संदल मिरवणूक काढण्यात येते व गोड भाताचा नैवेद्य व मलिदाचा नैवेद्य देवाला दिला जातो. पण दोन वर्षांपासून यात्रा उत्सव बंद झाले असल्याने देवाचा ठरावीक पूजाविधी करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Rajuman Baba Yatra at Rajapur canceled