शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

राज यांच्या नाशिकमधील सभेचा भाजपला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:01 AM

लाव रे व्हिडीओ म्हणून राज ठाकरे जाहीरसभेत म्हणतात आणि भाजप कार्यकर्त्यांना धडकी भरते, असे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र चित्र असतानाच आता पुढील आठवड्यात अशीच सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांकडून राज ठाकरे यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.

नाशिक : लाव रे व्हिडीओ म्हणून राज ठाकरे जाहीरसभेत म्हणतात आणि भाजप कार्यकर्त्यांना धडकी भरते, असे लोकसभा निवडणुकीत सर्वत्र चित्र असतानाच आता पुढील आठवड्यात अशीच सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप समर्थकांकडून राज ठाकरे यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.राज ठाकरे यांनी निवडणुकीत उमेदवार दिले नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात प्रचार केला जात आहे. राज यांच्या सभांमध्ये मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी केलेली विधाने आणि नंतर केलेली विधाने याचे व्हिडीओ देतानाच डिजिटल व्हिलेजमधील स्टिंग आॅपरेशन असो किंवा अन्य काही विषयांबाबतचे पुरावे असो ते थेट सभेत मांडत असल्याने भाजपची अडचण होते आहे. त्याला उत्तर देणे अवघड होत असल्याने थेट राज ठाकरेंवर टीका केली जात  आहे.राज ठाकरे यांची अवस्था ‘पिंजरा’ सिनेमातील मास्तरसारखी झाली आहे. ज्या तमाशाला गावातून बाहेर काढायचे होते. त्या तमाशात तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे.. काका मला वाचवाच्या तुफान यशानंतर आता काका मला राज्यभर नाचवा... आमच्या लहानपणी सायकल भाड्याने मिळायची आता रेल्वे इंजिन भाड्याने मिळतंय... अजून किती अच्छे दिन पाहिजेत बे.. अशाप्रकारच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असून, राज ठाकरे यांना अनावृत्त पत्र लिहून त्यांच्याकडून अशाप्रकारे महाआघाडीसाठी काम करण्याची अपेक्षा नव्हती अशा लिखाण केलेल्या गंभीर पोस्टदेखील आहेत. निवडणुकीत उमेदवार उभा केलेला असो अथवा नसो, कोणाला पाठिंबा दिला नसेलही परंतु राज ठाकरे या निवडणुकीत चांगलेच चर्चेत ठरत आहेत.ए लाव रे तो (राज ठाकरे यांचा) व्हिडीओ...राज ठाकरे यांनी यापूर्वी ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्या बाजूनेच ते असे बोलत आहेत, हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावर राज ठाकरे यांचेदेखील व्हिडीओ लाव रे तो व्हिडीओ भाग १, भाग २ नावाने व्हायरल होत आहेत. पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत मोदी जेव्हा सकाळी अंघोळ करतातना त्यावेळी महाराष्टÑातील कॉँग्रेस - राष्टÑवादीच्या नेत्यांनी जाऊन दोन चमचे पाणी घेतले पाहिजे, असा एका वाहिनीवरील व्हिडीओ, छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना मफलर आवळून बांधकाम करावेसे वाटते असे म्हणणारा आणि अजित पवार यांच्याविरोधात केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकRaj Thackerayराज ठाकरे