राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 00:59 IST2021-01-13T00:58:20+5:302021-01-13T00:59:30+5:30

मुंबईहून नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस आता १९ जानेवारीपासून दररोज धावणार असल्याचे पत्र रेल्वे बोर्डाने जारी केले आहे.

The Rajdhani Express will run daily | राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार

राजधानी एक्स्प्रेस दररोज धावणार

नाशिकरोड : मुंबईहून नवी दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस आता १९ जानेवारीपासून दररोज धावणार असल्याचे पत्र रेल्वे बोर्डाने जारी केले आहे.    याबाबत खासदार हेमंत गोडसे, प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी सांगितले की, मुंबई दिल्ली राजधानी एक्स्प्रेस हिचा मोठा फायदा नाशिककरांना होतो. राजधानी एक्सप्रेस दरररोज सुरू करावी यासाठी रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा  केला जात होता. आठवड्यातून चार दिवस धावणारी राजधानी एक्स्प्रेस  आता दररोज धावणार आहे. राजधानीचा वेग वाढविण्यात आला असून यामुळे नाशिककरांना लवकर दिल्ली गाठणे शक्य होईल. राजधानी एक्स्प्रेस दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. 

Web Title: The Rajdhani Express will run daily