शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पाथरे येथे आरोग्य विभागाच्यावतीने मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 8:35 PM

पाथरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांची काळजी म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागातर्फे मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ करण्यात आला.

पाथरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांची काळजी म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागातर्फे मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ करण्यात आला.आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी वारेगाव, पाथरे बुद्रुक, पाथरे खुर्द, कोळगाव माळ येथील सर्व कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत आहे. हे करत असताना आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ताण तणाव निर्माण होत आहे. हा ताण तणाव निर्माण होऊ नये म्हणून पाथरे येथील उपकेंद्रात दररोज सकाळी राजयोग साधना आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या टीमला हेल्थ वॉरियर टीम म्हणून नाव दिले आहे. ही टीम खरोखरच लढाऊ वृत्तीने आण िमनाने लढत आहे. हेल्थ वारियर टीममध्ये ६० आशा आणि अंगणवाडी सेविका, १२आरोग्य सेवक आणि सेविका, दोन गट प्रवर्तक, पाच समुदाय आरोग्य अधिकारी, तीन वैद्यकीय अधिकारी अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.दररोज सकाळी सर्व कर्मचारी, अधिकारी उपकेंद्रात एकत्र आल्यानंतर राजयोग साधना, ध्यानमुद्रा करून घेतली जात आहे. यात प्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रमरी, कपालभाती, मन शांत राहील याच्यासाठी श्वासाचे व्यायाम १५ ते २० किलोमीटर केले जात आहे. नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची उमेद कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये निर्माण होत आहे. प्रत्येकाने स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी.घरी गेल्यानंतर साबणाने, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे. जमल्यास अंघोळ करावी नंतरच कुटुंबात सामील व्हावे अशा सूचना यावेळी देण्यात येत आहे.वावी प्राथमिक आरोग्य अधिकारी अजिंक्य वैद्य, श्रीकांत शेळके, वैभव गरु ड हे या शिबिराला मार्गदर्शन करत आहे. तालुका आरोग्य अधिकारी मोहन बच्छाव उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक