बेलगाव कुहेच्या सरपंचपदी राजाराम गुळवे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:11 AM2018-03-24T00:11:10+5:302018-03-24T00:11:10+5:30

इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बेलगाव कुºहेच्या सरपंचपदी राजाराम शिवाजी गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत ही निवड झाली.

Rajaram Gulve unopposed for Belgaum Quay sarpanch | बेलगाव कुहेच्या सरपंचपदी राजाराम गुळवे बिनविरोध

बेलगाव कुहेच्या सरपंचपदी राजाराम गुळवे बिनविरोध

Next

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बेलगाव कुºहेच्या सरपंचपदी राजाराम शिवाजी गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत ही निवड झाली. वृषाली गुळवे यांनी आवर्तन पद्धतीने दिलेल्या राजीनाम्यामुळे सरपंच निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्या गटाची बेलगाव कुºहे ग्रामपंचायतीत सत्ता आहे.रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी राजाराम शिवाजी गुळवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या नावाची सूचना वृषाली गुळवे यांनीआणली. यावेळी उपसरपंच कोंडाजी गुळवे, ग्रामपंचायत सदस्य कांचन गुळवे, संगीता गाडे, राजाराम बोराडे, कमल धोंगडे उपस्थितहोत्या. तलाठी सुवर्णा गांगुर्डे, ग्रामसेवक किरण अहिरे, दत्तू धोंगडे आदींनी कामकाज पाहिले. ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत करून जल्लोष केला.

Web Title: Rajaram Gulve unopposed for Belgaum Quay sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.