शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

By admin | Updated: March 2, 2015 00:08 IST

‘मराठा’च्या संपादकपदासाठी राज ठाकरे यांचा ‘गृहपाठ’!

सुदीप गुजराथी ल्ल नाशिकआचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाचे हक्क विकत घेऊन मनसेचे मुखपत्र काढण्याच्या तयारीत असलेल्या राज ठाकरे यांनी आता ‘संपादक’पदाचा गृहपाठ सुरू केला आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज यांनी मनसेच्याच ग्रंथोत्सवातून आचार्य अत्रे यांची सर्वच्या सर्व वैचारिक पुस्तके विकत घेऊन याचाच प्रत्यय दिला. विशेष म्हणजे, या पुस्तकांचे साडेचार हजार रुपयांचे बिलही त्यांनी जागेवरच भरले. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’च्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ढवळून काढली होती. ‘मराठा’तील त्यांच्या घणाघाती अग्रलेखांना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते; मात्र अत्रे यांच्या निधनानंतर ‘मराठा’ दैनिक बंद पडले होते. याच ‘मराठा’चे हक्क राज ठाकरे यांनी अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्याकडून विकत घेतले असून, ‘मराठा’याच नावाने ते पक्षाचे मुखपत्र सुरू करणार आहेत. त्याच्या संपादकपदी ते स्वत:च विराजमान होणार असून, राज यांच्या या नव्या इनिंगविषयी राज्यभर उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशकात मनसेच्या वतीने ग्रंथोत्सव सुरू आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज यांनी या ग्रंथोत्सवाला आवर्जून भेट दिली. मोठ्या उत्सुकतेने आणि बारकाईने ग्रंथप्रदर्शन पाहतानाच त्यांनी अनेक पुस्तकांची खरेदी केली. त्यांत आचार्य अत्रे यांच्या सर्व वैचारिक पुस्तकांचा समावेश होता. अन्य पुस्तकांचे लेखक, प्रस्तावना, अनुक्रमणिका असा तपशील पाहून घेणाऱ्या राज यांनी अत्रेंची पुस्तके मात्र फक्त मुखपृष्ठ पाहूनच खरेदी केली. त्यांत नवयुग वाचनमाला, अत्रेप्रहार, अत्रेवेद, अत्रे उवाच, हंशा आणि टाळ्या, झालाच पाहिजे!, सूर्यास्त, वस्रहरण, आत्रेय वाणी, अध्यापक अत्रे (डॉ. स. गं. मालशे) आदि पुस्तकांचा समावेश होता. अत्रे यांनी त्यांच्या ‘मराठा’ दैनिकात, ‘नवयुग’ साप्ताहिकात व ‘अध्यापन’ मासिकात वेळोवेळी केलेल्या लेखांचा व भाषणांचा या पुस्तकांत समावेश आहे. विशेष म्हणजे, आचार्य अत्रे यांचे अन्य कथासंग्रह, नाटकांच्या पुस्तकांना राज ठाकरे यांनी हातही लावला नाही. या ग्रंथोत्सवातून त्यांनी एकूण २७ पुस्तके विकत घेतली. त्यांचे ४ हजार ५२० रुपये एवढे बिल झाले. ते राज यांनी स्वीय सचिवामार्फत भरले आणि मगच मुंबईचा रस्ता धरला.