राज ठाकरेंचे काळारामला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:08 IST2018-12-23T01:08:10+5:302018-12-23T01:08:37+5:30

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले.

Raj Thackeray's blackmail | राज ठाकरेंचे काळारामला साकडे

राज ठाकरेंचे काळारामला साकडे

नाशिक : शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले. यानंतर त्यांनी मंदिराची पाहणी करताना वास्तुकलेचा इतिहास जागवला.
गेल्या पाच दिवसांपासून राज ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी शनिवारी (दि.२२) दौºयाचा समारोप केला. पुत्र अमित यांच्या विवाहाची पत्रिका खान्देशची कुलदेवता असलेल्या वणी येथील सप्तशृंगी देवीला अर्पण करणाºया राज यांनी काळाराम मंदिरातही अमित यांच्या विवाहामुळे काळाराम मंदिरात संकल्प केला. नरेश पुजारी यांनी पौरोहित्य केले तसेच यावेळी चंदन पुजाधिकारीदेखील उपस्थित होते. यानंतर श्री काळाराम संस्थानच्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला.

Web Title: Raj Thackeray's blackmail