राज ठाकरे म्हणतात, मंत्र्यांना कांदे फेकून मारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:32 AM2018-12-20T01:32:27+5:302018-12-20T01:32:59+5:30
कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही युतीच्या ...
कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही युतीच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला. कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दोन दिवसांपासून जिल्हा दौºयावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १९) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. राज यांचे कळवण शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांच्या गजरात मनसैनिकांनी स्वागत केले. उद्योगपती बेबीलाल संचेती यांच्या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर बेबीलाल संचेती यांच्यासह सुनील संचेती, निर्मला संचेती तसेच मनसे तालुकाध्यक्ष शशी पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, माजी शहराध्यक्ष नितीन पगार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटना, डॉक्टर असोसिएशन यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, अजय दुबे, उपाध्यक्ष चेतन मैंद, दीपक दुसाने, कृष्णा जगताप, उमेश भास्कर, सुरज पगार, नीलेश शिंदे, केदा गवांदे, संदीप पवार, रोहन निकम, रोशन निकम, अक्षय सोनवणे, उदय सोनवणे, पराग मालपुरे, कुणाल वडखळे, सुशांत मोरे, विनय कोठावदे, अमोल सोनवणे, उदय पिंगळे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईला येण्याचे आमंत्रण
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कळवण तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादकांना मुंबई येथे आमंत्रित केले. कांदा प्रश्न नेमका काय आहे, याचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. कांदा प्रश्नावर प्रगतिशील शेतकरी मधुकर पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मुरलीधर पगार, राकेश पाटील, पंडित वाघ ,पांडुरंग पगार यांनी चर्चा केली.
शेतकरीप्रश्नी आंदोलन
शेतकरी साथ देतील तर मनसे रस्त्यावर उतरतील, असे सांगत राज ठाकरे यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचेही स्पष्ट केले.पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करतील त्यात तुम्ही सहभागी होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना केला.