शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद केशव गोसावी यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे : वीरपत्नी यशोदा

By अझहर शेख | Updated: January 5, 2019 18:06 IST

तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्दे नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुलभ होईल,...अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील रहिवासी असलेल्या गोसावी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा लान्सनायक केशव सोमगीर गोसावी याने देशासाठी हौतात्म्य पत्कारले. त्यांचे स्मारक लवकरात लवकर उभारावे, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी केली आहे.

नव्या वर्षाची नवी सुरूवात म्हणून शहरातील गंगापूररोड येथे राहणाऱ्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्या घरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नींसह माजी सैनिकांच्या पत्नींचा घरगुती मेळावा शनिवारी (दि.५) झाला. यावेळी गोसावी उपस्थित होत्या.

त्या म्हणाल्या, माझे पती शहीद केशव हे आमच्या कुटुंबाचे आधारवड होते. त्यांच्या बलिदानाचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. त्यांचे बलिदान हे सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही, तसेच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांच्या बलिदानाच्या बदल्यात भारतीय सेना पाकिस्तान व जम्मु-काश्मिरमध्ये घुसखोरी करणा-या आतंकवाद्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती सरकारने सेनेचे हात बळकट करण्याची.शहीद केशव यांच्या पार्थिवावर गावात जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तेथे लवकरात लवकर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारावे आणि येत्या स्वातंत्र्यदिनाला त्यांच्या स्मारकावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, अशी मागणी वीरपत्नी यशोदा गोसावी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी स्मारकासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यादृष्टीने अद्याप कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत पालकमंत्र्यांनी केले होते; मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पुर्ण झालेले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. तसेच शासकिय कार्यालयात लिपिक म्हणून मला नोकरी मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अधिक सुलभ होईल, त्यामुळे सरकारने माझ्या नोकरीचा विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा असतो; मात्र सैन्यदलातील जवानांच्या संरक्षणासाठीदेखील भारतीय सेनेला अत्यावश्यक सोयीसुविधा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरविणे गरजेचे आहे. सरकारने भारतीय सेनेचा विश्वास वेळोवेळी उंचावून जवानांची ताकद वाढवावी, अन्यथा वीर जवानांचे बलिदान व्यर्थ जाईल, असेही वीरपत्नी यशोदा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिकMartyrशहीदIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर