शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

रायपूरला जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:12 PM

एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.

पाटोदा : एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.श्री संत मुरलीधर बाबा कातरणी पतसंस्थेचे वसुली अधिकारी अशोक बंदरे या जंगलातून जात असताना त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने येवला पोलीस ठाण्यात सदर घटना कळवत तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाची मागणी केली. तसेच आगीचे रौद्ररुप वाढत असल्याने त्याची माहिती स्थानिक परिसरातील नागरिकांनाही दिली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णत: विझवली. आग विझविण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तसेच पोत्याच्या वापर केला.आग विझल्यानंतर येवला व मनमाड नगरपालिकेचे फायर ब्रिग्रेडचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बंब उशिराने पोहोचण्याचा प्रकार यापूर्वीही घडल्याची खंत रायपूर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ यांनी व्यक्त केली.नुकत्याच लागवड केलेल्या जंगली झाडांना आगीपासून धोका होऊ नये यासाठी रायपूर येथील खंडेराव गुंजाळ ,मारु ती मोरे,बाळू सोनवणे,शिवाजी कदम ,वैभव कासव, अशोक बंदरे यांनी वनविभागाची कुमक येण्यापूर्वीच शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून अशी कामे निस्वार्थी भावनेतून करावी. याबाबत स्थानिकानी केलेल्या कामगिरीची प्रशंसा वनरक्षक एन.एस.बिन्नर यांनी केली.आग विझविण्यासाठी रायपूर येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार,विलास ताटपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.खंदारे,भास्कर डुकरे, नामदेव पवार, भारत वाघ,दयानंद कासव,अशोक शिंदे, अशोक आहेर,केदू वानखेडे, साहेबराव गांगुर्डे, मारु ती मोरे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :fireआग