पिंपळगावी पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:52 IST2021-09-27T22:52:20+5:302021-09-27T22:52:50+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरात सोमवारी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने कामगार, व्यवसायिक, शेतकरी आणि मजुरांची धांदल उडाली.

पिंपळगावी पावसाचा कहर
ठळक मुद्देअचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले.
पिंपळगाव बसवंत : परिसरात सोमवारी जोरदार पावसाने सुरुवात केल्याने कामगार, व्यवसायिक, शेतकरी आणि मजुरांची धांदल उडाली.
घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्याच्या परिसरात पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधावा लागला. परिसरात काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढण्याची वेळ आली. या पावसाने पिंपळगाव, लोणवाडी, शिरसगाव, कोकणगाव, मुखेड, उंबरखेड आदी परिसरात हजेरी लावली. कुठे पळापळ तर कुठे पावसासाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, मात्र अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले.