अवकाळी पावसाने हरिणांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:24 IST2020-03-28T22:24:41+5:302020-03-29T00:24:20+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले असले तरी वनक्षेत्रातील पशु-पक्ष्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पावसाने हरिणांना दिलासा
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाचे नुकसान झाले असले तरी वनक्षेत्रातील पशु-पक्ष्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. वनक्षेत्रातील ठिकठिकाणी असलेले खड्डे व पाणवठेही पाण्याने भरले गेले आहेत. राजापूर परिसरात खडकाळ जमीन असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी डबकं भरून जातं. वाढत्या उन्हाने पाणीसाठा कमी होतो, परिणामी वनक्षेत्रातील पशु अन्नपाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. यात अनेकदा विहिरीत पडून वा अपघाताने पशूंचे बळीही जातात. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मात्र वनक्षेत्रातील हरीण व इतर प्राण्यांया पिण्याच्या पाण्याचा ऐरणीवर आलेला प्रश्न तूर्त तरी सुटला आहे. वनक्षेत्रात हरीण व इतर प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.