शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

सिन्नर तालुका परिसरात पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:10 IST

सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वितभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे बळीराजाला पावसाळ्यात दुष्काळाची अनुभूती येत आहे.

ठळक मुद्देरब्बीच्या हंगामाची शेतकºयांना चिंता

सिन्नर तालुक्यात पावसाअभावी खरिपाची जळालेली पिके.

सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वितभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. वरुणराजाच्या अवकृपेमुळे बळीराजाला पावसाळ्यात दुष्काळाची अनुभूती येत आहे.सिन्नर तालुका तसा अवर्षणग्रस्तच, त्यातल्या त्यात पूर्व भाग दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नदी व पाण्याचा स्रोत नसल्याने पूर्व भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतो. पावसाळ्यात बाजरी व कडधान्ये अशी पिके घेतली जातात. गेल्या चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. या खरिपाच्या पिकावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यावर्षी पावसाच्या ओलीवर शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतात उतरून पडलेले पीक जळून चालले आहे.पावसाळा अंतिम चरणात आला तरी पाऊस होत नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेले बाजरी, मका, सोयाबीन व कडधान्याची पिके कोमेजून गेली आहे. आज ना उद्या पाऊस होईल व किमान खरिपाचे पीक येऊन जनावरांपुरता चारा होईल, ही बळीराजाची भोळी आशा मावळल्यात जमा आहे. त्यामुळे शेतकºयांनी खरिपाच्या उतरून पडलेल्या पिकात जनावरांना चरण्यासाठी सोडल्याचे चित्र आहे. महागडी बियाणे पेरण्यासाठी शेतकºयांनी कर्ज काढले किंवा नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेतले. याशिवाय शेतकºयांनी घेतलेले कष्टही वाया गेले आहे. पाऊस नसल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची परिस्थिती बिकट झाली आहे. आगामी महिनाभराच्या काळात पाऊस झाला तरी खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्या उगवलेल्या पिकाचा जनावरांच्या चाºयासाठी आत्ताच उपयोग करून घेणे योग्य ठरणार आहे.जनवारांच्या चाºयाची परिस्थिती अवघड झाली आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकºयांना अन्य तालुक्यांतून चारा विकत आणावा लागत आहे. खरिपाचे पीक गेले तरी जनावरांना वाचविणे महत्त्वाचे असल्याने शेतकरी मिळेल ते पर्याय निवडताना दिसत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित काळ कसा जाईल, याची विवंचना बळीराजासह प्रशासनाला लागून राहिली आहे.११ गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना टॅँकरने पाणीपुरवठापावसाळा संपत आला असला तरी तालुक्यात टॅँकरची मागणी वाढतच आहे. सध्या तालुक्यातील ११ गावे व ५७ वाड्या-वस्त्यांवर १३ टॅँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. निºहाळे-फत्तेपूर, खापराळे, फुलेनगर, पाटपिंपरी, सोनारी, बारागावपिंप्री, आडवाडी, पांगरी खुर्द, घोटेवाडी, पिंपळे, सायाळे, गुळवंच, फर्दापूर, जयप्रकाशनगर या गावांना व वाड्या-वस्त्यांना दहा खासगी व तीन शासकीय टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.रब्बीच्या हंगामाची शेतकºयांना चिंतासिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातच नव्हे तर तालुक्यात सर्वत्र खरिपाचे पीक वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. तीन महिने वाट पाहूनही पाऊस न झाल्याने सोयाबीनचे पीक जळून चालले आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेली सर्वच पिके पावसाअभावी शेतात करपू लागली आहेत. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकºयांपुढे खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम कसा घ्यावा असा प्रश्न पडल्याने शेतकºयांपुढे चिंता वाढली आहे.