शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

नाशिकरोड परिसरात पाऊस; कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST

वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

नाशिकरोड : वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.यंदा पावसाळा ऋतुमध्ये म्हणावा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गात थोडेसे चिंतेचे वातावरण आहे. श्रावण महिन्यातदेखील नेहमीप्रमाणे पाऊस न पडल्याने ऐन गणेशोत्सव-नवरात्रीत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. गेल्या २०-२२ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारपासून नाशिकरोड व आजूबाजूच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू राहिल्यामुळे सायंकाळपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. तर पादचारी, दुचाकी चालकांना पावसामुळे आजुबाजूला आडोसा घ्यावा लागला होता.पावसाच्या संततधारेमुळे रस्त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी थोड्या प्रमाणात वाहत होते. जवळपास वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.कार्यकर्त्यांमध्ये नाराजीगणेशोत्सव मंडळांना लागू केलेल्या जाचक अटींमुळे मंडळांची रोडावलेली संख्या, वाढती महागाई, अनुत्साह आदी कारणांमुळे नाशिकरोड परिसरात हातावर मोजण्याइतकेच मोठे गणेशोत्सव मंडळे राहिली आहेत. मंडळाचा देखावा कार्यकर्त्यांनी पूर्ण साकारण्यात दोन-तीन दिवस गेल्यानंतर घरोघरी गौरी-गणपतीमुळे देखावे बघण्यास म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. गणेशोत्सवास शेवटचे पाचच दिवस शिल्लक असताना दुपारपासून पावसाचे आगमन सुरू झाले होते. सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे व पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे भाविक देखावे बघण्यास घराबाहेर न पडल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्यात सुरू झालेल्या पावसामुळे कार्यकर्ते व भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.एकलहऱ्यात हलक्या सरीएकलहरे : परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून कडक ऊन पडलेले होते. दुपारनंतर आभाळात काळ्या ढगांनी गर्दी केली व संपूर्ण पंचक्रोशीत पावसाचे वातावरण तयार झाले. साडेचारच्या सुमारास बºयापैकी पाऊस कोसळला; मात्र दहा मिनिटातच त्याचा जोर कमी झाला. अधूनमधून कोसळणाºया या सरींमुळे सर्वत्र जमिनीत ओल निर्माण झाली असून, आणि हवेत गारठा जाणवू लागला. या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांना जीवदान मिळाले.

टॅग्स :RainपाऊसGaneshotsavगणेशोत्सव